जी एन एम म्हणजेच ‘जनरल नर्स मिड वायफरी’ होय. यांना स्टाफ नर्स असे सुद्धा म्हणतात.हा साधारण तीन ते साडेतीन वर्षाचा अभ्यासक्रम असतो. महिला व पुरुष सुद्धा हा कोर्स करू शकतात. कालावधी : 3वर्ष शैक्षणिक पात्रता: ♦ १२वी पास आर्ट्स, कॉमर्स,सायन्स, पैकी कुठलीही शाखा. तसेच एम सी व्ही सी. ♦ विद्यार्थ्यांचे वय 17 ते 35 च्या दरम्यान असावे.
GNM कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी आधी प्रवेश परीक्षा सुद्धा द्यावी लागते. त्या प्रवेश परिक्षेतील गुणानुसार या कोर्स ला प्रवेश दिला जातो. GNM कोर्स पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला राज्याच्या नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी करावी लागते. जेणेकरून तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी सोपे होते. GNM कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. किंवा नर्सिंग इंस्टिट्यूट नर्सिंग होम यांमध्ये सुद्धा नोकरी करू शकता. सुविधा: प्रशस्त कॉलेज बिल्डिंग, अद्यावत लॅबोरेटरी, स्वतंत्र ग्रंथालय,मुलींसाठी वसतिगृह, उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद,प्रशस्त क्लास रूम, प्रॅक्टिकल साठी नामांकित हॉस्पिटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रशिक्षणाची सोय.
नोकरीच्या संधी एकदा का तुम्ही नर्सिंग मधील कोर्स चांगल्या संस्थेतून पूर्ण केला तर सरकारी किंवा खाजगी अनेक ठिकाणी तुम्हाला नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. यामध्ये साधारणपणे पुढील विभागात तुम्हाला नोकरी मिळते. सरकारी व खाजगी रुग्णालये, रेल्वे डिपार्टमेंट मध्ये नर्सिंग स्टाफ, संरक्षण विभागात नर्सिंग स्टाफ, कॉलेज व युनिव्हर्सिटीज मध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, फार्मासयुटीकल कंपन्या, अनाथाश्रम वृद्धाश्रम आरोग्य निवास मध्य, नर्सिंग इंस्टिट्यूट मध्ये, NGO (सेवाभावी संस्था ) मध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात.
स्टाफ नर्स : रुग्णांची काळजी घेणे, औषधे देणे, रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि डॉक्टरांना मदत करणे हे स्टाफ नर्सचे मुख्य कार्य आहे.
वॉर्ड नर्स : वॉर्डमधील रुग्णांची काळजी घेणे, वॉर्डचे व्यवस्थापन करणे आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे हे वॉर्ड नर्सचे मुख्य कार्य आहे.
स्पेशलिटी नर्स : एमएससी नर्सिंग पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्पेशलिटी नर्स बनू शकता. स्पेशलिटी नर्स म्हणून तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, जसे की हृदयरोग, न्यूरोलॉजी, किंवा बालरोग, काम करू शकता.
नर्सिंग शिक्षक : तुम्ही नर्सिंग महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करू शकता आणि विद्यार्थ्यांना नर्सिंगचे शिक्षण देऊ शकता.
नर्सिंग प्रशासक : तुम्ही रुग्णालय किंवा दवाखान्याच्या प्रशासनात काम करू शकता आणि नर्सिंग विभागाचे व्यवस्थापन करू शकता.
उच्च मागणी : भारतासह जगभरात नर्सची मोठी गरज आहे. या क्षेत्रात चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
विविध क्षेत्रांमध्ये संधी : रुग्णालयांबरोबरच सार्वजनिक आरोग्य क्षेत्र, संशोधन संस्था, औषध कंपन्या इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये नर्सिंगची संधी आहेत.
आत्मसमाधान : रुग्णांची काळजी घेणे आणि त्यांच्या बरे होण्यात सहभागी होणे हे अतिशय समाधानदायक असते.
नोकरीची सुरक्षितता: नर्सिंगमध्ये नोकरीची सुरक्षितता चांगली आहे. एकदा तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि पदवी प्राप्त केल्यानंतर, तुम्हाला रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी मिळू शकतात.
चांगला पगार: नर्सिंगमध्ये पगार चांगला आहे. अनुभव आणि शिक्षणानुसार पगार वाढत जातो.
व्यक्तिगत समाधान: नर्सिंग क्षेत्रात काम करून तुम्हाला लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि त्यांना मदत करण्याची संधी मिळते.
विविधता : नर्सिंग क्षेत्रात अनेक प्रकारचे करिअर पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार निवड करू शकता.