news image

कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन (RJF) विषयी...

कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन (RJF) छत्रपती संभाजीनगर ह्या संस्थेची स्थापना ई.सन 2017 साली करण्यात आली. श्री अरुण रघुनाथ पाटील हे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये तसेच पुढील काळात वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच्या तसेच सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने आम्ही या संस्थेची स्थापना केली असून संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये नर्सिंग स्कूल सुरू करून पाहिले पाऊल ठेवले आहे. कै.रघुनाथराव जगताप फाऊंडेशन संचलित ग्लोबल नर्सिंग स्कूल पाचोरा ची स्थापना इ स २०२४ साली करण्यात आली.


कै.रघुनाथराव जगताप यांचे बद्दल विषयी...

सन 1928 च्या दरम्यान जन्मलेले रघुनाथराव, तीन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. पाचोरा तालुक्यातील शिंदाड पोस्ट च्या हद्दीतील एक छोटेसे गाव. कडेवडगाव त्या गावांमध्ये व परिसरामध्ये वटवृक्ष किमान तीनशे वर्षे जुना असावा. तसेच डोंगराच्या कडेला असल्यामुळे या गावाला कडे वडगाव असे नाव पडले असावे. कडे वडगाव या गावात जन्मलेले रघुनाथराव भावंडांमध्ये सगळ्यात लहान गावांमध्ये स्वातंत्र्यापूर्वीच शाळा होती. चावडी वर शिक्षण दिले जात होते. गावामध्ये शिक्षण हे जेमतेम चौथीपर्यंत. त्यानंतर गुरे चारणे व शेती कुणबी हा व्यवसाय करणे कुणबी म्हणजे शेती करणारा. डोंगराच्या कडेला मिळालेल्या डोंगराळ टेकडी असलेल्या त्या जमिनीला अंग मेहनतीने मोठमोठे दगडाचे बांध घालून व नंतर त्यावर डोंगरावरची माती टाकून डोंगर टेकडीची माती समान करून अर्ध आयुष्य हे जमिनी तयार करण्यात घालवले. त्यानंतरच्या उर्वरित आयुष्यामध्ये जमीन सुपीक करून शेती व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. 1972 ला दुष्काळ पडला, तेव्हा कर्ज काढावे लागले. महिना साल धरून लोकांची मोलमजुरी करून कर्ज फेडले. तरीसुद्धा अजून काही कर्ज फेडायचे राहून गेले, म्हणून गाव सोडून ऊस तोडीसाठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये शहादा, प्रकाशा येथे जावे लागले. मुलींचे लग्न आणि इतर जबाबदाऱ्या पार पडताना आमचे भावंडांचे शिक्षण राहून गेले.

अरुण हा लहान मुलगा ह्या लहान मुलास त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. वेळ पडली तर काठीने बदडून शाळेत पाठवले. पुढे अरुण गावातील चौथीपर्यंतच्या शाळेतून चौथी पास होऊन इयत्ता पाचवी मध्ये चाळीसगाव येथे बहिणीकडे शिक्षणासाठी गेला. आणि रघुनाथरावांना आनंद वाटला. ते म्हणाले हा माझे स्वप्न पूर्ण करीन. अरुण शिकला नोकरीला लागला वडिलांचे रघुनाथरावांचे स्वप्न पूर्ण केले. रघुनाथराव बैलांच्या मारामारीत जखमी झाले. अरुण याने वडिलांचे तुटलेले हाड वैद्यांकडून दुरुस्त केले. परंतु वृद्धापकाळमुळे रघुनाथराव थकले आणि 1998 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

अरुण ह्या मुलाने पुढे, कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. वडिलांच्या नावाने स्थापन केलेले संस्थेला आज कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन संचलित ग्लोबल नर्सिंग स्कूल. ए. एन. एम. तसेच जी. एन. एम. हे आरोग्य, वैद्यकीय क्षेत्रातील कॉलेज मिळाले आणि खऱ्या अर्थाने रघुनाथरावांना श्रद्धांजली अर्पण झाली. पुन्हा एकदा कष्टकरी गरीब शेतकऱ्याला भावपूर्ण आदरांजली🙏💐





news image

            कै. रघुनाथराव जगताप (1928-1998)





news image

            कै. अक्षय पाटील (संस्थापक सचिव)


इंजिनीयर स्वर्गवासी अक्षय पाटील सर यांच्या विषयी...

अक्षय पाटील सर यांचा जन्म इ स 30 जून 19 95 रोजी झाला असून मृत्यू 8 एप्रिल 2021 रोजी झाला.


सूर्य मावळला तरी प्रकाश रेंगाळत असतो,
जरी सहवास संपला तरी आठवणींचा सुगंध दरवळत असतो,
सारे काही असतानाही उणीव तुझी सदैव भासत असते..!
तू बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आमची आणि प्रेरणा तुझी आम्हाला कायम पुढे नेत असते.. पुढे नेत असते....!

अत्यंत आनंदी आणि सुखी अशा कुटुंबामध्ये सण 30 जून 1995 रोजी एका गोंडस बाळाने जन्म घेतला देवाने अशी मूर्ती घडवली की ती कुणालाही हवी हवीशी वाटणारी असा सुंदर युवराज जगताप कुळातील भारती अरुणपाटील यांच्याकडून जन्माला आला.

ज्याचा कधीही क्षय होत नाही असा त्याचे नाव ठेवले अक्षय मराठी मिडीयम मध्ये चौथीपर्यंत शिकला आणि इयत्ता पाचवी पासून सैनिकी शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावी पास झाल्या नंतर एमआयटी कॉलेज येथे त्यांनी डिप्लोमा इन सिव्हील हा कोर्स केला. त्यानंतर श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज येथे बी ई सिविल ही पदवी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून प्राप्त केली.

अक्षय सरांनी कै. रघुनाथराव जगताप या संस्थेमार्फत प्यारामेडिकल, नर्सिंग हे कोर्सेस पाचोरा जिल्हा जळगाव येथे सुरू केले. त्यांनी उत्तम दर्जाचे कोचिंग क्लास सुद्धा चालवले. ते इंजिनियर तर होतेच, पण उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. ते अतिशय उत्तम असे थ्रीडी डिझाईन तयार करायचे इंजीनियरिंग प्लान बनवायचे.


त्यांनी कोरोना काळात अनेक सामाजिक कार्य केले. पाचोरा येथील पोस्ट कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचा कोरोना दूत म्हणून त्यांनी सत्कार केला आणि त्यांना कोरोना दूत हा किताब संस्थेमार्फत बहाल केला. ते आर. जे. फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक सचिव होते. त्यांनी ग्लोबल नर्सिंग स्कूल या संस्थेची स्थापना केली.ग्लोबल नर्सिंग स्कूल साठी ए एन एम आणि जी एन एम हे कोर्स आपल्या संस्थेला मिळावे यासाठी त्यांनी जिवाचे रान करून, भाऊ ऋषिकेश पाटील व वडील अरुण पाटील यांच्या विचाराने अथक प्रयत्न करून पाचोरा शहरातील अनेक हॉस्पिटल पिंजून काढले. आणि आवश्यक ती डॉक्युमेंट्स जोडून ग्लोबल नर्सिंग स्कूल ए एन एम तसेच जी एन एम संस्थेची फाईल संपूर्णपणे तयार करून ठेवली. पुढे कोरोनाचा प्रभाव वाढला व संपूर्ण जगासह भारतामध्येही लॉकडाऊन लागला. त्यानंतर त्या क्रूर कोरोना ने अक्षय सरांचा बळी घेतला. त्यांचे कार्य पुढे संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील ,सचिव हर्षदा पाटील व कोषाध्यक्ष ऋषिकेश पाटील सरांनी पुढे नेले आणि संस्थेला 2024 2025 मध्ये ग्लोबल नर्सिंग स्कूल ए एन एम/ जी एन एम मान्यता मिळाली. स्वर्गवासी अक्षय सरांना भावपूर्ण आदरांजली .🙏💐