अध्यक्षांचे मनोगत तसेच संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट: कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन(RJF) ह्या संस्थेची स्थापना मुळात सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसाठी झालेली असून निस्वार्थ समाज उपयोगी सेवा प्रदान करण्याच्या हेतूने वृक्षारोपण, सिंचन, डोंगरी, आदिवासी ,दलित ,पीडित, आर्थिक आणि सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागाचा समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने तसेच त्या समाजाला आरोग्य, शिक्षण व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे ह्या उद्देशाने संस्था कार्यरत राहील. तसेच बालवाडी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या विषयांचे भौतिक ज्ञान देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात संस्था पदार्पण करेल .संस्थेचे संस्थापक सचिव स्व. अक्षय अरुण पाटील यांनी पॅरामेडिकल, नर्सिंग ह्या अभ्यासक्रमाची सुरुवात करून संस्थेस मोठी दिशा देण्याची महत्त्वकांक्षी कार्य सुरू केले. त्यांनी ग्लोबल नर्सिंग स्कूल /कॉलेज या संस्थेद्वारे ए एन एम/ जी एन एम हा मेडिकल तथा वैद्यकीय क्षेत्राशी संबधित कोर्स आपल्या संस्थेने सुरू करावा त्यासाठी जिवाचे रान केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी प्रस्ताव तयार करून मजबूत अशी पायाभरणी केली. अशा ह्या महान सिव्हिल इंजिनियर असलेल्या महामानवास मी त्रिवार वंदन करतो.
संस्थेला मिळालेल्या ग्लोबल नर्सिंग स्कूल कृष्णापुरी पाचोरा ए एन एम / जी एन एम या दोन वैद्यकीय शैक्षणिक संस्था चालू करण्यासाठी कर्मवीर शिक्षण सम्राट डॉक्टर बाळासाहेब पवार साहेब, शंकरराव अडसूळ ,बिपिन जावळे, संस्थेचे सदस्य डॉक्टर जयंतराव पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ मिळाले. संस्था आरोग्य शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घेण्याचे कार्य करेल. त्यासाठी संस्थेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्या ज्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्ये मिळाले त्यांचा मी (आर जे फाउंडेशन) या संस्थेतर्फे कायम ऋणी राहील. आणि या सर्व मंडळींचे सहकार्य कायमच संस्थेच्या सोबत राहील. संस्था अजूनही बरेच असेच सहकारी मित्र जोडण्याचे कामही यापुढे अविरतपणे सुरू ठेवेल. आर जे फाउंडेशन ही संस्था मागील सहा वर्षापासून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सहभागी आहे यादरम्यान संस्थेने राज्यामध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षित करून पाठविले आहेत आणि विद्यार्थ्यांना सर्वाधिक मूल्यवान शिक्षण दिले आहे.
आमचे विचार दूरदृष्टी आणि उद्दिष्टे सर्वसामान्य वातावरणामध्ये उपलब्धतेनुसार सर्वोत्तम सोयी सुविधा द्वारा सहाय्यक शिक्षा उपलब्ध करणे राहील. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हा सर्वोच्च इच्छा ठेवेल. स्वप्नपूर्ती तसेच जीवनामध्ये सफलता प्राप्त करेल .आर जे फाउंडेशन ही अशी संस्था आहे जी असे स्री /पुरुष घडवण्याचा प्रयत्न करते की, जे अधिक न्यायपूर्ण मानवी जगाची निर्मिती करेल. आपली संस्था बौद्धिक वाढीसाठी प्रयत्न करते. जे की, सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने विचारपूर्वक आणि कौशल्यपूर्ण विचारधारेवर आधारित आहे. दया, क्षमा ,शांती तसेच क्षमता, वचनपूर्ती त्या मानवी स्वभावाची ओळख आहे ज्याची आम्ही निर्मिती करू इच्छितो. आणि प्रोत्साहन देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.
आर जे फाउंडेशन यापुढे आरोग्य ,वैद्यकीय शिक्षणासोबतच आपल्या देशातील घराघरांमध्ये कुशल उद्योजक निर्माण करण्याच्या दृष्टीने, तंत्रशिक्षणाकडेही जाण्याचे उद्दिष्ट पूर्ण करेल. जेणेकरून आपला देश हा आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होईल.
मानवाला तसेच सजीव सृष्टीला तारक ठरेल अशा सामाजिक उपक्रमांमध्ये ही संस्था हिरीरीने भाग घेत आहे. जसे की जलयुक्त शिवार, वृक्षारोपण, रक्तदात्यांकडून रक्त दान शिबिरे, वैचारिक समुपदेशन इत्यादी कार्यही संस्था करते आहे. सौर ऊर्जा, गोपालन, वृद्धाश्रम, निर्मिती क्षेत्र तसेच प्रशिक्षण यांचा प्रसार , प्रचार व अंमलबजावणी करण्याचाही संस्थेचा मानस आहे .
जय हिंद आपला नम्र अरुण रघुनाथ पाटील अध्यक्ष - कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन(RJF) छत्रपती संभाजीनगर